WhatsApp Image 2019-01-29 at 10.17.49 AM

रोह्यातील कबड्डी स्पर्धेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन

कोकण महाराष्ट्र

रोहा प्रतिनिधी : देशातील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय अजिंक्यपद (प्रौढ गट )या कबड्डी स्पर्धेला रोह्यात मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष आ. जयंत पाटील,राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार,महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन सहकार्यवाह आस्वाद पाटील, कार्याध्यक्ष खा.गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडले.या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे,माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, आदी उपस्थित होते.


Shein WW

ऑलिम्पिकच्या धर्तीवर या सामन्यांचे रोह्यात आयोजन करण्यात आले असल्याने राष्ट्रीय पातळीवर या स्पर्धेची निश्चितच दखल घेतली जाईल, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.या स्पर्धेसाठी देशातील एकूण ३२ संघानी सहभाग घेतला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *