WhatsApp Image 2019-01-29 at 10.24.37 AM (1)

व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत रायगड पोलीस संघ प्रथम

कोकण क्रीडा

अलिबाग प्रतिनधी :- पेझारी येथील भैरवनाथ स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत रायगड पोलीस संघाने प्रथम क्रमांक मिळविला. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या हस्ते या संघासह सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात आला.


Netmeds [CPS] IN

पेझारी येथे दि. २३ जानेवारी रोजी या स्पर्धा सायंकाळी चार ते सकाळी सहा या वेळेत घेण्यात आल्या होत्या. अंतिम सामना रायगड जिल्हा पोलीस संघ विरुद्ध जे. एस.डब्लू डोलवी या संघामध्ये झाला. अटीतटीच्या सामन्यांमध्ये रायगड पोलीस संघाच्या खेळाडूंनी चुरशीने खेळत विजय आपल्याकडे खेचला. जे. एस.डब्लू संघावर मात करीत सात गुणांनी रायगड जिल्हा पोलीस संघाने यश संपादन केले.
या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून रायगड जिल्हा पोलीस दलातील बिपीन जगदीश थळे यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित केले. रायगड जिल्हा पोलीस कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्ल पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी संघासह सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *