NH66-BOGADA-KASHEDI-GHAT

कशेडी घाट बोगद्याचे संकल्पचित्र तयार

कोकण

पोलादपूर प्रतिनिधी : तालुक्यातील मुंबई ते गोवा महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील नियोजित बोगद्याचे संकल्पचित्र तयार तयार झाले असून लवकरच कशेडी बोगद्यांपर्यंत रस्ता करण्याचे काम पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.


Kaspersky Many GEOs

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट हा कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या अनेक वर्षा पासून सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे शापित ठरला आहे.
या घाटातील प्रस्थावित ३.४४ किलो मीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्वीकारले असून ४४१ कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ म्हणजेच पदवीचा मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ पुनर्वसन आणि सुधारण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्याच वर्षी अभियांत्रिकी प्रॉक्यूआरमेंट आणि कन्ट्रक्शन यांच्या सोबत ४४१ कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना २ तीन पदरी बोगदे तयार करण्यात येणार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *