WhatsApp Image 2019-01-28 at 11.18.58 AM

लाईफटाईम हॉस्पिटल मध्ये आता हृदयविकार रुग्णांवर होणार अद्ययावत उपचार

कोकण महाराष्ट्र

सिंधुदुर्ग प्रतिनिधी  :-मल्टी सुपर स्पेशालिटी एसएसपीएम लाईफटाईम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मध्ये परदेशी अद्ययावत कॅथलॅबची सुविधा असलेला सुसज्ज आणि परिपूर्ण असा कार्डिओलॉजी (हृदय शाश्त्र विभाग ) विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोकणात प्रथमच अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रियांची सुविधा निर्माण झाली आहे.


Shein WW

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटलचे संस्थापक,माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या हस्ते आणि सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे,सचिव आ.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे आणि जर्मनमधील अत्याधुनिक मशिनरींची सुविधा असलेल्या कॅथलॅबचे उदघाटन करण्यात आले.
हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रिटेंडेंट डॉ. आर.एस. कुलकर्णी म्हणाले, हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी विभागाचा शुभारंभ झाला असून कॅथलॅबची सुविधा सुविधा झाली आहे. कोकणात अशा प्रकारची सुविधा अन्यत्र कोठेही नाही. त्यामुळे आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *