bnkmm3o8_india-vs-new-zealand-odi-afp_625x300_27_January_19

न्यूझीलंड विरोधातील तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजयी

क्रीडा

मुंबई प्रतिनिधी :-भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 7 विकेटनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्णधार रॉस टेलर (93) आणि टॉम लॅथम (53) या दोघांचा धावांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.


Kaspersky Many GEOs

न्यूझीलंडने भारताला 244 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 व्या षटकात पूर्ण केले.विराट कोहली आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. रोहितने 62 तर कोहलीने 60 धावा केल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *