thane-swabhiman-2

कोपरीकरांसाठी व ठाणेकरांसाठी स्वाभिमान संघटना तर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र
ठाणे प्रतिनिधी – घोडबंदर रोड ते ठाणे स्टेशन पर्यंत जे खाजगी वाहतूक ज्या खाजगी बसेस सुरु आहे, त्याच्यामुळे ट्राफिक होत आहे. यामुळे होणाऱ्या अपघातात लोकं बळी पडत आहेत. त्याच्या विरोधात काल  स्वाभिमान संघटनेने ठाणे वाहतूक डी.सी.पी अमित काळे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांना निवेदन देण्यात आले. खासगी बसेसवर कारवाई व्हावी अन्यथा स्वाभिमान संघटना ठाणेकरांची जीवाशी खेळ होऊ देणार नाही व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार.


7/24 perfumes

काय आहेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याच्या मागण्या 
१) विश्वनाथ विभूते सारख्या एका चांगल्या गृहस्थाचा प्रायव्हेट बसच्या धक्क्यामुळे अपघाती निधन झाला याला जबाबदार प्रायव्हेट बस व ओवरलोड करून वाहतूक करणारे बस चालक आहेत.
२) कोपरी येथे आरटीओची चौकी व्हावी.
३) प्रत्येक बसची परमिट चेक करण्यात यावी.
४) ओवरलोड बसेसवर कारवाई करण्यात यावी.
५) ओवरलोड खाजगी वाहतूक वर टाटा सुमो, एन्जॉय, तवेरा व इतरांवर कारवाई करण्यात यावी.
६) हायवेवर बस उभी करण्यात येऊ नये.
७) खाजगी बसेसच्या व प्रायव्हेट कार यांच्या इंजिन फिटनेस सर्टिफिकेट, इन्शुरन्स व पी.यू.सी अशाप्रकारे प्रत्येक पेपरची तपासणी व्हावी.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *