Nirav-Modi-bungalow-demolis

नीरव मोदीच्या अलिबाग मधील बंगल्यावर कोणत्याही क्षणी कारवाई

कोकण महाराष्ट्र

अलिबाग प्रतिनिधी – नीरव मोदीच्या अलिबाग, किहीम इथल्या बंगल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. अलिबाग किनारी जमीन विकत घेऊन अनेकांनी येथे बंगले बांधले आहेत. यामध्ये नीरव मोदीचा देखील समावेश आहे. सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करुन हे बंगले बांधण्यात आले आहेत.अलिबागच्या किहीम समुद्रकिनारी त्याचा ३० हजार चौरस फुटांचा अनधिकृत बंगला आहे. हा बंगला अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात होता. अंमलबजावणी संचालनायलायनं या बंगल्याचा ताबा रायगड जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे.


Shein WW

याआधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हायकोर्टाकडे अर्ज केला होता की, या बंगल्यावर कारवाई करु नये. त्यानंतर हायकोर्टाने ‘ईडी’ला चांगलंच सुनावलं होतं. नीरव मोदीचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त का करत नाही. बंगल्यावरील कारवाईवर ‘ईडी’ला स्थगिती का हवी आहे अशा शब्दात कोर्टाने ईडीला सुनावलं होतं. यासंदर्भात महिनाभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देखील दिले होते.
वर्सोली, सासवणे, कोलगाव, धोकवडे या गावांमध्ये अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी याआधी नीरव मोदीच्या बंगल्याविरोधात कारवाईची नोटीस काढली होती. पण सीबीआयने हा बंगला सील केला होता. त्यानंतर ‘ईडी’ने चौकशीसाठी तो ताब्यात घेतला होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *