about-hospital

लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये उद्या पासून कार्डिओलॉजीची सुविधा

कोकण महाराष्ट्र

कणकवली प्रतिनिधी :- २६ जानेवारीला शुभारंभ :डॉ. आर.एस.कुलकर्णी यांची माहिती
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी पडावे येथे सुरु केलेल्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक मशिनरीने सुसज्ज लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये दि. २६ जानेवारी रोजी दुपारी २. ३० वा. कॅथलॅबचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खा. नारायण राणे व एस.एस.पी.एम च्या अध्यक्षा निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. पिवळ्या व केसरी रेशनकार्ड धारकांना अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. हि सुविधा येथे प्रथमच सुरु होत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य सेवेमध्ये पुन्हा एकदा मनाचा तुरा रोवला जाणार आहे. अशी माहिती एस.एस.पी.एम लाईफ टाईम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.एस.कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाचे सीईओ डॉ. प्रणय अगरवाल,डॉ मिलींद कुलकर्णी उपस्थित होते.


Kaspersky Many GEOs

अँजिओप्लास्टी मोफत -:
अँजिओग्राफीसाठी फी फक्त ६०००/- रुपये आहे. तसेच ज्या पेशंटच्या अँजिओग्राफीमध्ये अँजिओप्लास्टी करावी लागेल असे आढळल्यास महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत पिवळे व केसरी रेशनकार्ड धारकांना दोन्ही शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील अशी माहिती डॉ मिलींद कुलकर्णी यांनी दिली. इतर खाजगी हॉस्पिटल पेक्षा ३० टक्के सवलतीच्या फीमध्ये लाईफ टाईम मध्ये उपचार केले जात असल्याचे डॉ.आर. एस. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *