2naxal

सुरक्षा दल आणि नक्षलवादी चकमक,एक नक्षलवाद्याला कंठस्नान

महाराष्ट्र

प्रतिनिधी  : गडचिरोलीजवळील मुसपर्शी जंगलात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली असून या चकमकीत एक नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.


7/24 perfumes

२२ जानेवारीला नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन आदिवासींची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर जिल्ह्यात पोलिसांनी मोठे अभियान राबवले आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) पोलीस मदत केंद्रापासून जवळच असलेल्या मुसपर्शी (छत्तीसगड) जंगलात पोलीस व नक्षलींमध्ये चकमक झाली. दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युतर देताच नक्षलवादी जंगलात पळून गेले. पोलिसांना घटनास्थळी एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दैनंदिन वापराचे साहित्यही ताब्यात घेतले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *