DxqHVNBUwAA-tIN

भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर सहज विजय,मराठमोळ्या स्मृती मानधनाने झळकावले शतक

क्रीडा

भारतीय महिला संघाची न्युझीलंड महिला संघाविरुध्द आजपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली. मराठमोळ्या स्मृती मानधनाने या सामन्यात १२० चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. भारताने तिच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. एकदिवसीय कारकिर्दीतील स्मृतीचे हे चौथे शतक होते. परदेशात जाऊन तिने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
आजच्या पहिल्या सामन्यात यजमान संघाने भारतासमोर १९३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र स्मृती मानधना आणि जेमिमा रोड्रिगेजने १९० धावांची भागीदारी केल्यानं भारताला दणदणीत विजय मिळवता आला.भारतीय महिलांनी या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *