chahal-759

भारताला विजयासाठी १५८ धावांची गरज

क्रीडा

भारत आणि न्यूझिलंडमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवनं ३९ धावांत घेतलेल्या ४ विकेटच्या जोरावर भारताला न्यूझिलंडला १५७ धावांवर थांबवण्यात यश आलं.
भारताला विजयासाठी १५८ धावांची गरज आहे. कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या. शमीनं १९ रनांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या तर युझवेंद्र चहलने २ विकेट पटकावल्या. भारतीय बॉलर्सनं केलेल्या दमदार कामगिरीमुळे ३७ ओव्हर्समध्येच न्यूझिलंडचा डाव संपला.
आज नेपियरच्या मैदानात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.सामन्याच्या सुरुवातीलाच मोहम्मद शमी आणि यजुवेंद्र चहलनं कमाल दाखवली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *