crime-bug

धक्कादायक,पतीने केला पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीचा खून

महाराष्ट्र

पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) पहाटे पुण्यात घडली.अयाज शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी आरोपी पतीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी तबससुम शेख आणि अडीच वर्षची मुलगी अलिना शेख या दोघींचा खून केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयाज शेख आणि त्याची पत्नी तबस्सुम शेख यांच्यात घटस्फोटासाठी न्यायालयात खटला दाखल आहे. त्यामुळे तबस्सुम आपली मुलगी अलिना शेख हिच्यासह वेगळी राहात होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून मंगळवारी पहाटे अयाजने तबस्सुमच्या माहेरी जाऊन तिच्या आणि मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला. यामध्ये दोघींचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यावर अयाजने घरातच रक्ताने एक संदेशही लिहून ठेवला. मै किसको नहीं छोडूंगा, निकल जाओ मेरे घरसे, असा संदेश त्याने घरातील भिंतीवर रक्ताने लिहून ठेवला होता.
या खुनाची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून त्यांनी आरोपीने खुनासाठी वापरलेला चाकू जप्त केला. त्याचबरोबर लगचेच त्यांनी अयाज शेखलाही ताब्यात घेतले. तबस्सुम आणि मुलगी अलिना झोपेत असतानाच अयाजने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *