Virat-with-ODI-Trophy

आयसीसी अवॉर्डवर विराटचाच बोलबाला

क्रीडा

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ ने कसोटी मालिका जिंकली. द्विसंघ मालिका विजय हा भारताने पहिल्यांदाच मिळवला. त्यामुळे हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला. या विजयासोबत ज्या प्रकारे अनेक विक्रम भारतीय संघाने रचले तसेच काही विक्रम भारतीय संघाने आणि कर्णधार कोहलीने देखील केले आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे भारताला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम ठेवता आले आहे. भारतीय संघाचे कसोटीत एकूण ११६ अंक आहेत.

TataCliq [CPS] IN

आयसीसी (ICC)ने २०१८ च्या सर्वश्रेष्ठ कामगिरीवर विविध अवॉर्डची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हॅट्रीक केली आहे. विराट हा आयसीसीच्या वनडे तसेच टेस्ट टीमचा देखील कर्णधार ठरला आहे. आयसीसीने आज वनडे टीम ऑफ द ईयर आणि आयसीसी टेस्ट टीम ऑफ द ईयरची घोषणा केली. ज्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला या मान मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे आयसीसीच्या वनडे टीममध्ये ४ भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तर टेस्ट टीममध्ये ३ भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली याने २०१८ मध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करत भारतीय टीमला देखील अनेक सामने जिंकवून दिले. विराट कोहली हा २०१८ मधील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ठरला आहे.

 


TataCliq [CPS] IN

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *