sarsoli-tournament1

केबी खैरे ठरला सारसोली चषक २०१९ चा विजेता संघ

कोकण क्रीडा गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र

सारसोली – रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची लढत असलेल्या सारसोली या गावात संपन्न झालेली क्रिकेटची महास्पर्धा उत्साहात पार पडली. केबी खैरे हा संघ या वर्षीच्या चषकाचा मानकरी ठरला. असिफ इलेव्हन वरवटणे सोबत झालेल्या अंतिम लढतीत केबी खैरे या संघाने ९ गडी आणि ५ चेंडू राखून सहजरित्या अंतिम आणि महत्वाचा सामना जिंकून चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे केबी खैरे या संघात कोणताही बाहेरील खेळाडू घेतला गेलेला नव्हता. अशाप्रकारे सारसोली येथे क्रिकेटचे महायुद्ध अतिशय शिस्तप्रिय वातावरणात आणि मैत्रीपूर्ण संबंधात आणि अनेक नावाजलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडले.

सारसोली चषक २०१९ च्या अंतिम निकालाचा संक्षिप्त आढावा
प्रथम क्रमांक – केबी खैरे । बक्षीस रुपये १,११,१११/- आणि आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक – असिफ इलेव्हन वरवटणे । बक्षीस रुपये ५५,५५५/- आणि आकर्षक चषक
तृतीय क्रमांक – अप्पा इलेव्हन खैराळे । बक्षीस रुपये २५,५५५/- आणि आकर्षक चषक

उत्कृष्ट फलंदाज – योगेश चौधरी ( असिफ इलेव्हन वरवटणे ३२ चेंडूमध्ये ७३ धावा )
उत्कृष्ट गोलंदाज – जहीर (अप्पा इलेव्हन खैराळे ३ षटके १९ धावा आणि ५ गडी बाद )

अंतिम सामना मॅन ऑफ दि मॅच – मुस्तकीन मुकादम (केबी खैरे । बक्षीस सोन्याची अंगठी (किंमत १०,०००/- रुपये )
मॅन ऑफ द सिरीज – तौफिक काझी (असिफ इलेव्हन वरवटणे । ३४ चेंडूंमध्ये ७९ धावा । बक्षीस सोन्याची चैन (किंमत २०,०००/- रुपये )

सारसोली चषक जिंकणे हे आमचे ध्येय आणि स्वप्न होते. या चषकावर आमच्या संघाचे नाव कोरण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत होतो. येथे याच वर्षी नाही तर दरवर्षी असलेले सुंदर नियोजन हे आम्हांला येथे चषक जिंकण्यासाठी आकर्षित करते. सारसोली येथील स्पर्धा जिंकणे आमच्यासाठी खूप महत्वाची होती आणि हे आमच्यासाठी एक आव्हान होते कारण हि स्पर्धा आमच्या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. त्याचबरोबर, आमच्या गावातील नागरिकांनी आमच्यासाठी दिलेली साथ आम्हांला प्रेरणादायी होती.केवळ त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हांला हे यश प्राप्त करता आले. अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेल्या मुस्तकिन मुकादमने सारसोली चषकाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. मालिकेच्या अंतिम लढतीत मुस्तकिनने एका षटकात केवळ एक धाव देऊन फलंदाजी करताना ३ चेंडूत ९ धावा पटकावल्या आणि यात त्याचा विजयी षट्कारसुद्धा होता.

 

sarsoli-tournament3

sarsoli-tournament2


TataCliq [CPS] IN

snp-agro


TataCliq [CPS] IN

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *