img_110693_mukesh_ambani

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीने गाठले नवे शिखर

व्यापार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडील संपत्तीने मात्र नवे शिखर गाठले आहे. ब्लूममर्गने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार गेल्या दहा वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १७४ पटींनी वाढ झाली आहे. २००९ साली मुकेश अंबानी यांच्याकडे १,१३,९६० कोटी रुपयांची संपत्ती होती. दहा वर्षानंतर हा आकडा ३,११,९६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याची तुलना करायची झाल्यास दहा वर्षात अंबानी यांची संपत्ती १,९८,००५ कोटी रूपयांनी वाढल्याचे दिसून येते.काही दिवसांपासून भारतीय भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे रिलायन्स समूहाच्या कंपन्यांच्या समाभागांची किंमत वाढली आहे. याशिवाय, रिलायन्स जिओची दूरसंचार क्षेत्रातील घौडदौड थक्क करणारी आहे. आगामी काळात ई-कॉमर्स क्षेत्रात रिलायन्सकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मुकेश अंबानी यांची पत उंचावली आहे.
गेल्यावर्षी फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थान पटकावले होते. गेल्या ११ वर्षांपासून ते पहिल्याच क्रमांकावर आहेत.

 


Ajio [CPS] IN

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *