local_train

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई

कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये उंबरमाळी स्थानकाजवळ बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे खर्डी, आटगाव स्थानकाजवळ लोकल आणि काही लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत.
लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *