54766-accident_0

डम्परच्या धडकेत मोटारसायकल स्वराचा जागीच मृत्यू

कोकण महाराष्ट्र

मुंबई – गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातल्या जिते या गावाजवळ डम्पर आणि मोटार सायकल यांच्या धडकेत मोटारसायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गेल्या दोन तासांपासून रस्ता रोखून धरला होता.
आज सकाळी डम्पर आणि मोटार सायकलच्या धडकेत खारपाडा गावचे रहिवासी यशवंत घरत यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी डम्परच्या काचा फोडल्या… तसंच डंपर चालकावर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत वाहतूक रोखून धरणार, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.
आंदोलनासाठी जिते, खारपाडा या गावांतील अनेक स्त्रिया, पुरुष आणि तरुण वर्ग इथं मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला होता. त्यांनी वाहतूक रोखून धरल्यानं मुंबई – गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी दिसून झाली. कोकणात जाणारी आणि कोकणाकडून येणारी अशा दोन्ही बाजुंनी वाहतूक जवळपास ठप्प झाली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *