1547969833-Total_Dhamaal_poster2

टोटल धमाल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मनोरंजन

अभिनेता अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी आणि रितेश देशमुख यांच्या आगामी टोटल धमाल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. धमाल चित्रपटाच्या सिरीजमधील हा तिसरा चित्रपटा आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. यावेळी टोटल धमाल चित्रपटात अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, जॉनी लिव्हर यांसारखे मात्तबर कलाकार आहेत.
टोटल धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. या चित्रपटातही आधीच्या चित्रपटाप्रमाणे सर्व कलाकार मंडळी ५० कोटी रुपयांच्या पाठीमागे धावताना दाखवले आहेत. चित्रपटात अनिल आणि माधुरी गुजराती जोडपे दाखवण्यात आले आहेत.माकड क्रिस्टलही यात तगड्या विनोदी कलाकारांसोबत झळकणार आहे. याआधी क्रिस्टलने अनेक हॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे.टोटल धमाल हा चित्रपट येत्या २२ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *