sarsoli-tournament

अकरा हजारापासून झालेली सुरुवात आज एक लाख अकरा हजारांच्या घरात. सारसोली चषकाची दमदार सुरुवात

कोकण क्रीडा गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र

गावपातळीवरील क्रिकेट स्पर्धेच्या वाढत्या गर्दीत रायगड जिल्ह्यातील सारसोली या गावाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण, येथील सूत्रबद्ध पद्धतीने केलेले स्पर्धेचे नियोजन, शांतप्रिय वातावरणात राबविलेली तीन दिवसीय स्पर्धा आणि विशेष म्हणजे येथील तरुणांमध्ये असलेली एकता. आज याच कारणांमुळे सारसोली येथील क्रिकेट चषकाचा दर्जा उंचावत आहे. किंबहुना सारसोली गावाचा दर्जा उंचावत आहे.
गावातील दिनेश पवार, महेश बोरकर आणि त्यांच्या इतर सर्व तरुण साथीदारांनी या स्पर्धेसाठी घेतलेली कठोर मेहनत, स्पर्धा जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे कश्यापद्धतीने राबविता येईल यासाठी अहोरात्र घेतलेले कष्ट, त्यासाठी घेतलेला ध्यास, त्यात ओतलेले प्राण आणि त्यांना गावकऱ्यांनी दिलेली साथ. या अचूक समीकरणांमुळेच आज या चषकाला राज्यस्थरीय महत्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच, ज्या खेळाडूंना टेनिस क्रिकेट मध्ये जागतिक पातळीवर मान्यता आहे, असे खेळाडू ज्यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील आणि परदेशातील सुद्धा मैदाने आपल्या अनोख्या क्रिकेट शैलीने गाजविले आहेत. असे गाजलेले आणि नामांकित खेळाडू इतर स्पर्धासोडून सारसोली सारख्या एका छोट्या गावात शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येथील श्री बाबदेव क्रिकेट मैदान आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने गाजविण्यासाठी येतात आणि इथली लढाई प्रतिष्ठेची करतात. अस्सल दर्जा काय असतो तो यालाच म्हणतात.
आज, दिनांक १९ जानेवारी २०१९ रोजी या तीन दिवसीय चषकाला सुरुवात झालेली आहे.अकरा हजारापासून प्रथम बक्षिसाने झालेली सुरुवात आज एक लाख अकरा हजारांच्या घरात गेलेली आहे. या स्पर्धेचे महत्व असेच वाढत राहो अशी आई जगदंबे आणि सोमनाथा चरणी माझी प्रार्थना आणि सर्व ग्रामस्थांना आणि आयोजकांना स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन !

नितीन पाटील
सीईओ, एसएनपी सॉफ्टवेअर

snp-agro

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *