kanka-durga

शबरीमला मंदिर प्रवेश, कनकदुर्गा या महिलेवर हल्ला

देश

केरळमधील शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलांमधील कनकदुर्गा या महिलेवर तिच्या सासूने हल्ला केला आहे. समाजाची परंपरा मोडीत काढत कनकदुर्गेने शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने तिची सासू नाराज होती. आपली ही नाराजी तिने कनकदुर्गेला चोपून व्यक्त केली. दोन जानेवारीच्या पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या दोन महिलांनी शबरीमलामध्ये प्रवेश करुन भगवान अय्याप्पांचे दर्शन घेतले. त्यावरुन केरळमध्ये मोठा वाद आणि हिंसाचार झाला.
कनकदुर्गा मंगळवारी सकाळी पेरींतलमन्ना येथील तिच्या घरी परतली. त्यावेळी सासू आणि तिच्यामध्ये शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद झाला असे कुटुंबाच्या जवळ असलेल्या सूत्रांनी सांगितले.
सासूने कनकदुर्गाच्या डोक्यावर प्रहार केला. कनकदुर्गा या हल्ल्यामध्ये जखमी झाली. तिला पेरींतलमन्ना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *