15THNSM1FADNAVISPC

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद

महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविधभागांमधील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधताना, ‘भाजप सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करीत आहे.’ असे आश्वासन दिले.सरकारवर ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केवळ, ‘शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, खाजगी कंपन्यांना नाही’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘आमचं ध्येय शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे असून यासाठी आम्ही केंद्र आणि राज्यसरकारमध्ये समन्वय साधून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत आहोत. मला विश्वास आहे की आम्ही नक्कीच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवून दाखवू.’ असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *