1547468383-BEST_bus_strike_ANI

बेस्ट संप, मुंबईकरांची प्रचंड गैरसोय

मुंबई

बेस्टने मागील सहा दिवसांपासून संपाचे हत्यार उचलल्यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे. संप मिटविण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या तरी, संपावर तोडगा निघू शकला नाही. बेस्ट उपक्रमाला वाचवण्यासाठी अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. बेस्ट कर्मचारी गेले ५ दिवस संपावर असले तरी हे ९ हजार कोटी देण्याची किंवा त्यावर तोडगा काढण्याची तयारी महापालिका किंवा राज्य सरकारची नसल्याने संपाचा तिढा आजही कायम आहे.
बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळत नाही, निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या हक्काची ग्रॅच्युटी मिळालेली नाही. बेस्ट आर्थिक डबघाईला आली असताना महापालिका किंवा राज्य सरकारही बेस्टला वाचवण्यासाठी पुढे आलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांना अखेर संप पुकारावा लागला आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदतीची गरज आहे. बेस्ट हा मुंबई महानगरपालिकेचा अंगीकृत उपक्रम असल्याने बेस्टला आर्थिक मदत करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *