crime-bug

पैंजण चोरण्यासाठी कापले वृद्ध महिलेचे पाय

देश

चोरट्यांनी पैंजणांसाठी एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेचे पाय कापल्याचा घृणास्पद प्रकार गुजरातच्या कानवाला परिसरात समोर आला आहे. अतिरक्तस्त्रावामुळे या वृद्धेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ग्रामस्थांनी येथील शेतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. पोलीस याठिकाणी पोहोचले तेव्हा वृद्ध महिलेचे घोट्यापर्यंतचे पाय कापलेले होते. प्राथमिक तपासानंतर चोरट्यांना तिच्या पायातील पैंजण काढण्यासाठी हे कृत्य केलाचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. ही महिला जवळच्याच घरात एकटीच राहत असे. चोरट्यांनी लुटीच्या उद्देशाने तिच्या घरावर दरोडा टाकला. मात्र, घरात काहीच न मिळाल्यामुळे चोरट्यांनी वृद्ध महिलेचे पाय कापून पैंजण काढून घेतले. या पैंजणांची किंमत साधारण २० हजार रुपये इतकी होती. या निर्घृण हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरु केला असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *