maxresdefault

तेजस एक्प्रेसच्या धडकने तिघांचा जागीच मृत्यू

कोकण

पनवेल ते पेण रेल्वे मार्गावर सध्या काम सुरू आहे. जिते येथेही काम सुरु असून त्यासाठी रेल्वेचे काही कंत्राटी कामगार रेल्वे रुळाजवळ काम करण्यासाठी आले आहेत. त्यापैकी काही कामगार रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जिते गावात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून ते परत येत असताना रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसने अशोक बारे (३०), भीमसेन गुलकर(४५) व अजय दांडोडीया (२०)  यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, तिघांचाही गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *