l_4-1484877177_835x547

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचा राजीनामा

देश

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील पंतप्रधान उच्चस्तरीय निवड समितीच्या बैठकीमध्ये सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटविले. त्यानंतर आलोक वर्मा अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण दल आणि गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला आहे.
आलोक वर्मा हे १९७९ बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सीबीआयच्या आजपर्यंतच्या इतिहासातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरून कमी झालेले पहिले अधिकारी ठरले आहेत.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एम. नागेश्वर राव यांच्याकडे पुन्हा सीबीआयची सूत्र सोपविण्यात आली आहेत. वर्मा यांची सीव्हीसीकडून सुरू असलेली चौकशीही कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *