CYMERA_20180511_163031

पेण शहरातील इमारतीचे सांडपाणी रस्त्यावर,रहिवाशांना नाहक त्रास

कोकण

पेण शहरातील प्रभातनगर चिंचपाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सिद्धी समर्थ या सोसायटीचे सांडपाणी कोणतेही नियोजन न करता खड्डा खणून त्यात सोडले आहे. या विरोधात शेजारी असलेल्या जगदंब आशिष सोसायटीच्या सदस्यांनी पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या इमारतीच्या बांधकाम व्यवसायिक व त्यांना ना हरकत दाखला देणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
पेण चिंचपाडा येथील नव्याने विकसित होत असलेल्या प्रभात नगर येथे मुंबई येथील बालाजी डेव्हलपर्सतर्फे सिद्धी समर्थ ही इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या इमारतीचे सांडपाणी नगरपालिकेच्या नाल्यात न सोडता खड्डा खणून त्यामध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *