Hardik-Pandya-KL-Rahul-karan-show-1

‘कॉफी विथ करण’ शो, हार्दिक पांड्या, लोकेश राहुलवर २ वन-डे सामन्यांची बंदी?

क्रीडा मनोरंजन

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी लागण्याची शक्यता आहे. ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये या दोघांनी मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली असल्याचे दिसून आले. यावरून BCCI ने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या दोघांनी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल या दोघांवर २ एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात यावी असे मत BCCI च्या प्रशासकीय समितीचे CoA अध्यक्ष विनोद राय यांनी केले आहे, तर या समितीतील महिला सदस्या डायना एडलजी यांनी मात्र हे प्रकरण BCCI च्या कायदे समितीकडे वर्ग करण्याचे मत व्यक्त केले आहे.
हार्दिकने दिलेले स्पष्टीकरण मला पटलेले नाही. त्यामुळे मी या गोष्टीसाठी त्या दोन्ही खेळाडूंना दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असे मत मांडले आहे. पण याबाबत अंतिम निर्णय हा डायना एडलजी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे विनोद राय यांनी सांगितले.
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे या दोघांवर प्रचंड टीका होत आहे. या दोघांनी केलेली विधाने BCCI ला चांगलीच खटकली. अशा विधानांमुळे BCCI ची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या दोघांना या शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *