DvZ4DOXUcAI1mKj

IND v AUS Test Match :भारताचा पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित

क्रीडा

मयंक अगरवाल,कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांची अर्धशतकी व चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला डावांत 7 बाद 443 अशी धावसंख्या उभारली आहे. कालच्या 2 बाद 215 वरून पुढे खेळताना भारताने आज आपला पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 8 धावां झाल्या असून ऑस्ट्रेलियाचा संघ अजूनही 435 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताकडून पहिल्या डावात फलंदाजीत मयंक अगरवालने 76, चेतेश्वर पूजाराने 106, विराट कोहलीने 82, रोहित शर्माने नाबाद 63 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 34 आणि ऋषभ पंतने 39 धावा केल्या. पूजाराने कालच्या 68 धावांवरून पुढे खेळताना आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपले 17 वे शतक पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *