315117-770386-trent-boult-afp

अवघ्या २० मिनिटांत श्रीलंकेचा खेळ संपुष्टात,बोल्टने घेतल्या १५ चेंडूमध्ये ६ विकेट्स

क्रीडा

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव १०४ धावांवर संपूष्टात आला आहे. न्यूझीलंडकडून या डावात ट्रेंट बोल्टने ३० धावांत ६ विकेट्स घेतल्या आहेत.
बोल्टने या ६ विकेट्स फक्त १५ चेंडूमध्ये घेतल्या आहेत. बोल्टच्या या भन्नाट स्पेलमुळे श्रीलंकेचा डाव अवघ्या १०४ धावांत आटोपला. या कसोटीत आता न्यूझीलंडकडे ७४ धावांची आघाडी आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने ४ बाद ८८ या धावसंख्येवरून डावाची सुरुवात केली. अँजलो मॅथ्यूज आणि रोशन सिल्व्हा यांनी सुरुवातीला सावधपणे खेळत धावसंख्या ९४ पर्यंत नेली. मात्र, यानंतर ट्रेंट बोल्टने श्रीलंकेचा डाव पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्याने सर्वप्रथम रोशन सिल्व्हाला स्लीपमध्ये झेलबाद करवले. या षटकात त्याने रिव्हर्स स्विंगची कमाल दाखवत आणखी दोन बळी घेतले.
यानंतर बोल्ट पुन्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने निरोशन डिक्वेला बळी मिळवला. त्यापाठोपाठ दिलरुवान परेरा आणि सुरंगा लकमल यांना पायचीत करून बोल्टने अवघ्या १०४ धावांवर श्रीलंकेचा गाशा गुंडाळला. श्रीलंकेच्या शेवटच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
बोल्टचा हा २० मिनिटांचा स्पेल न्यूझीलंडच्या संघासाठी स्वप्नवतच ठरला. आतापर्यंतच्या कारकीर्दीतील बोल्टची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *