images_1538024425999_mumbais_overcrowded_local_trains_have_lost_rs_3000_crore_in_3_years

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील खांदेश्वर-पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान दुरुस्तीकाम पूर्ण झाले असून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याचे ट्विटरवरून जाहीर करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी गाड्यांची वाहतूक उशिराने सुरू असून पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.
गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. त्यानंतर सुमारे पाऊण तासाने दुरुस्ती काम पूर्ण झाले आणि या मार्गावरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *