anumpa-kher-pm_201812175927

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे.
अनुपम खेर यांच्याखेरीज चित्रपटात अक्षय खन्ना, सुझॅन बर्नेट, आहाना कुमरा, अर्जुन माथूर हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये असणार आहेत. हा चित्रपट 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *