d648b07d243db4b6b434caf421fdc3f1

वैमानिक गुंजन सक्सेनाच्या भूमिकेतील जान्हवी कपूरचा फर्स्ट लुक

मनोरंजन

कर्तबगार महिलांच्या यादीतील एक नाव म्हणजे गुंजन सक्सेना. १८ वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्यांमध्ये गुंजन यांचे नावही तितक्याच अभिमानाने घेतले जाते. लढवैय्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जान्हवी कपूरची भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी वर्णी लागली आहे. सध्या तिच्या याच आगामी चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी या फोटोमध्ये वायूदलाच्या गणवेशात दिसत असून, तिचा हा लूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे.
सक्सेना यांचे १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यान जखमी सैनिकांना कारगिल क्षेत्रातून सुरक्षित स्थळी नेण्यासाठीच्या बचावकार्यात महत्त्वपूर्ण योगदान होते.कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *