kohli26122018

IND vs AUS 3rd Test :दिवसअखेर भारत २ बाद २१५

क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसात  भारताने नवोदित मयंक अग्रवाल (७६) आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा (६८ ) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिवस अखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीला आलेल्या हनुमा विहारीने ६६ चेंडूमध्ये ८ धावांची चिवट खेळी केली. तर मयंक अग्रवालने पदार्पणातच दमदार कामगिरी करताना ७६ धावांची खेळी केली.ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने २ बळी घेतले. पुजाराबरोबर सध्या कर्णधार विराट कोहली ४७ धावांवर नाबाद आहे. भारत – ऑस्ट्रेलिया ४ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *