images

भारताचे पुढील पंतप्रधान कोण ? सांगणं कठीण : बाबा रामदेव

देश

योगगुरु बाबा रामदेव यांनी २०१९ च्या निवडणुकांनंतर पंतप्रधान कोण होईल हे सांगता येणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. देशातली राजकीय परिस्थिती काहीशी विचित्र आहे त्यामुळे काय होईल ? जनता कोणाला कौल देईल, कोण पंतप्रधान होईल हे सांगता येणं कठीण आहे असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
बाबा रामदेव यांनी अचानक असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मदुराईमध्ये झालेल्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मी कोणालाही पाठिंबा देणार नाही कोणाचाही विरोध करत नाही. भारत हिंदू राष्ट्र व्हावं ही आमची इच्छा नाही तर भारत अध्यात्मिक राष्ट्र व्हावं ही आमची इच्छा आहे असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. मी भाजपाचा प्रचार करणार नाही असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. तसेच मी स्वतःला राष्ट्र निर्मिती, शिक्षण, कृषी आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये झोकून दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *