920x920

कांदिवली आग प्रकरण,आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई

कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यानंतर चार जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर चार फायर इंजिन आणि चार जंबो वॉटर टँकर्सच्या मदतीने रात्री साडेदहाच्या सुमारास पूर्णपणे आगीवर ताबा मिळवण्यात यश आले. आग विझवल्यानंतर शोधमोहिम सुरू असताना चार जणांचे मृतदेह आढळले. राजू विश्वकर्मा (पु/वय 30 वर्ष), राजेश विश्वकर्मा (पु/वय 36 वर्ष), भावेश पारेख (पु/वय 51 वर्ष), सुदामा लल्लनसिंग (पु/वय 36 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. मृत्यूमुखी पडलेले कारखान्यातील कामगार असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *