Cricket - India v England - Second One Day International - Barabati Stadium, Cuttack, India - 19/01/17. India's Yuvraj Singh celebrates after scoring a century.  REUTERS/Adnan Abidi

युवराज सिंगला मुंबई इंडियन्सन संघात स्थान

क्रीडा

जयपूरमध्ये मंगळवारी(१८ डिसेंबर) आयपीएल २०१९ साठी लिलाव पार पडला.भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने अगदी शेवटच्या मिनिटाला एक कोटींची बोली लावून विकत घेतले.युवराजला मुंबईने दुसऱ्या फेरीत आपल्या संघात स्थान दिले. युवराज मुंबई संघात असल्याने नेटकऱ्यांनी आता युवराज आणि रोहितची फटकेबाजी एकत्र पहायला मिळेल म्हणून आनंद व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी यांनेही युवराजची खरेदी ही आमच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात महत्वाची खरेदी असल्याचे म्हटले आहे.
युवराजसारखा धडाकेबाज फलंदाज एक कोटी रुपयांना मिळणे म्हणजे मागील १२ वर्षातील आमची सर्वात महत्वाची खरेदी आहे. युवराजने आत्तापर्यंत देशाला अनेक चषक मिळवून दिले आहेत.’ पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने विकत न घेतलेल्या युवराजला दुसऱ्या फेरीत अचानक विकत घेतल्याबद्दलही आकाशने मुंबई इंडियन्सची भूमिका स्पष्ट केली. आम्ही अनुभवी खेळाडू आणि तरुण खेळाडूंचा योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहोत.
२०१५ च्या पर्वामध्ये युवराजला दिल्लीने १६ कोटींची किंमत देऊन विकत घेतले होते. त्यावेळी त्याची कामगिरी चांगली झाली नाही. त्यानंतर प्रत्येक लिलावामध्ये युवराजच्या किंमत कमीकमीच होत गेली आहे. २०१६ च्या पर्वात सनरायझर्स हैद्राबादने ७ कोटींना युवराजला विकत घेतले होते. त्यानंतर मागील वर्षी पंजाबने त्याला दोन कोटींना विकत घेतले होते. मात्र २०१९ च्या पर्वासाठी पंजाबने युवराजला रिटेन न करता करारमुक्त केले.आता मुंबईच्या संघामधून युवराज कसा खेळतो याबद्दल मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *