mumbai-andheri-hospital-fire_201812171884

मुंबईतील अंधेरी कामगार रुग्णालय, आगीतील मृतांचा आकडा वाढला

मुंबई

अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला असून आगीतील मृतांचा आकडा ९ वर गेला आहे. शीला मोरवेकर या महिलेचा मृत्यू झाला आहे.
कामगार रूग्णालयाला सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचं समजत आहे. आग लागल्यानंतर झालेला धूर कोंडला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आठ जणांचा मृत्यू झाला होता, आज अजून एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ झाला आहे.या आगीत १५७ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *