apoorva-thakur

अलिबाग अपूर्वा प्रविण ठाकूर ठरली मिस टिन इंडिया युनीव्हर्स विजेती

कोकण महाराष्ट्र

अलिबागची अपूर्वा प्रविण ठाकूर ही मुलगी दिल्ली येथील मिस टिन इंडिया युनीव्हर्स स्पर्धेमधील विजेती ठरली आहे.अपूर्वाची आता हिंदुस्थानतर्फे आंतरराष्ट्रीय सौन्दर्य स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली आहे.
देशभरातुन १६ ते १९ वयोगटातील शेकडो स्पर्धकांच्या विविध परिक्षा घेतल्यानंतर त्यामधून १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यांत आली होती. या दहा जणांमध्ये अनेक स्पर्धात्मक फे-या पार पडल्यानंतर परिक्षकांनी अपूर्वा प्रविण ठाकूर हिला मिस टिन इंडिया युनीव्हर्स २०१९ जाहीर करून विजेतेपदाचा मुकूट तिला परिधान केला.
अपूर्वा ठाकूर ही अलिबाग येथील माजी आमदार मधुकर ठाकूर यांची नात, अ‍ॅड. प्रविण ठाकूर व कविता ठाकूर यांची कन्या असून तिचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथे को. ए. सो. इंग्रजी माध्यम, त्यानंतर सेंट मेरी हायस्कूल, गोल्ड इंटरनॅशनल नवी मुंबई, युनिव्हर्सीटी आर्टस ऑफ लंडन येथे झाले असून पुढील शिक्षणसाठी तिने थॉमस जेफरसर युनिव्हर्सीटी अमेरिका येथे आर्कीटेक्ट पदवीसाठी प्रवेश घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *