TEAM-INDIA-new

IND vs AUS अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीची अर्ध शतकी भागिदारी

क्रीडा

भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरू झाला आहे. सलामीची अॅडलेड कसोटी ३१ धावांनी जिंकून ‘टीम इंडिया’ तूर्तास १-० ने आघाडीवर आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ पूर्ण होऊन भारताच्या तीन बाद १७२ धावा झाल्या आहेत.
या सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंत भारताने ६ धावा करून मुरली विजयचा बळी गमवला. दुसऱ्या सत्रात राहुल २ धावा काढून त्रिफळाचित झाला. विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी करणारा पुजारा तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीला २४ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. स्टार्कने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *