sbi

बँक कर्मचाऱ्यांचा संप, ह्या दिवस राहणार बँका बंद

देश

बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी देशभराच काम बंद ची हाक दिली आहे. त्यामुळे पाच दिवस बॅंक व्य़वहार बंद राहणार असून सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. २१ ते २६ डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद असतील. २१ डिसेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीती विरोधात ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी बँकांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे २१ डिसेंबर रोजी संप, २२ आणि २३ डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. सोमवारी म्हणजे २४ डिसेंबर रोजी बँका उघडतील पण मोठ्या गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त सुट्टी आणि २६ डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचं काम सुरु असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *