Crime

धक्कादायक,गळ्यातील चेन मिळवण्यासाठी केली मित्राची हत्या

मुंबई

तिघांनी मिळून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंडीत ही घटना घडली आहे. आरोपींमध्ये 16 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबरला अविनाश दिलपे (26), कृष्णा सुतार आणि 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाने राजू गायकवाडला दारु पिण्यासाठी बोलावलं होतं. यावेळी तिघांनी राजू गायकवाड याच्यावर हल्ला करत त्याच्या गळ्यातील चेन काढून घेतली आणि खाडीत ढकलून दिलं अशी माहिती तपास अधिकारी विलास दायगुडे यांनी दिली आहे.
दुसऱ्या दिवशी राजू गायकवाड यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. 7 डिसेंबरला यल्लो गेटला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलीस कंट्रोल रुमला देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *