761955-717721-nitin-gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमादरम्यान भोवळ

महाराष्ट्र

अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना  भोवळ आली आणि ते खाली कोसळले. कार्यक्रमात सुरुवातीला त्यांचं भाषण झालं आणि राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली.
अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागर राव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. त्यांच्या बाजूला उभे असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांकडून नितीन गडकरी यांची तपासणी सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *