Lata-Mangeshkar-birthday_d

गाणं हा माझा श्वास आहे – लता मंगेशकर

मनोरंजन मुंबई

गाणं हा माझा श्वास आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार त्यामुळे निवृत्तीचा प्रश्न येतोच कुठे? असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लता मंगेशकर यांचे ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे व्हायरल झाले. या गाण्यासोबतच लता मंगेशकर या संगीतातून निवृत्ती घेणार असून या गाण्यानंतर लता मंगेशकर गाणार नाहीत, निवृत्ती घेणार आहेत. अशा आशयाचा मजकूरही व्हायरल झाला. मात्र या सगळ्या अफवा आहेत मी शेवटच्या श्वासापर्यंत गात राहणार असे लता मंगेशकर यांनी म्हटले आहे.
माझ्या निवृत्तीची अफवा कोणी पसरवली आणि त्या व्यक्तीचा यामागचा उद्देश काय होता? हे मला ठाऊक नाही. मात्र या सगळ्या अफवा आहेत. यावर लोकांनी मुळीच विश्वास ठेवू नये.
गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर गाणं सोडणार, निवृत्त होणार याची सोशल मीडियावर आणि नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र लतादीदींनी या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिल्याने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *