india-vs-australia-759

IND vs AUS : दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ७ बाद १९१

क्रीडा

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ७ बाद १९१ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडच्या चिवट अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात भारताने सर्वबाद २५० धावा केल्या. त्यानंतर उत्तम खेळ करून मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानावर आले. मात्र भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची धांदल उडाली. अश्विनने सर्वाधिक ३ बळी टिपले.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. इशांत शर्माच्या पहिल्याच षटकात अॅरोन फिंच त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर हॅरिस आणि ख्वाजा यांनी खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाली. अखेर रविचंद्रन आश्विनने हॅरिसला माघारी धाडत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने २ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर हॅरिस २६ धावांवर बाद झाला. अनुभवी शॉन मार्शला २ धावांत अश्विनने माघारी धाडले. लगेचच ख्वाजा २८ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ११७ अशी झाली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *