ls-polls-union-minister-gets-voting-machine-direction-changed-to-suit-vastu-in-karnataka_170414054134

विधानसभा निवडणूक – राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज मतदान

देश राजकीय

राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज मतदानाला सुरुवात होत आहे.तेलंगणमध्ये ११९ तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होणार आहे. राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. अखेरच्या दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात अनेक सभा घेतल्या. सत्तांतराचा इतिहास असलेल्या राज्यात काँग्रेसनंही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे कौल नेमका कुणाच्या बाजुनं जातो याची देशभरात उत्सुकता आहे.
तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे. तेलंगणमध्ये २.८० कोटी नागरिकांकडे मतदानाचा अधिकार आहे. राज्यात एकूण ३२,८१५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. राजस्थानात १९९ जागांसाठी २,२७४ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५१,६६७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *