681939-modinirav-041618

किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश

कोकण महाराष्ट्र

रायग़डच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत.
नीरव मोदीचा अलिबागमधील किहीम गावात तर आवास गावात मेहुल चोक्सीचा बंगला आहे. महसूल आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन हे बंगले उभारताना केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना १ ऑगस्टला अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल केला होता. अलिबागमध्ये नीरव मोदीसह इतरांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली होती. न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *