भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्या पूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी बँकांचे पूर्ण कर्ज फेडण्यास तयार आहे,पण व्याज देऊ शकत नाही. तरी बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे ट्विट विजय मल्याने आज केले आहे. तसेच पक्षनेते आणि प्रसारमाध्यमांवर पक्षपाती असण्याचा आरोप केला असून मी अपराधी नसल्याचे विजय मल्याने म्हंटले आहे.विजय मल्याने म्हंटले कि, मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी किंगफिशर कंपनी भारतात मागील तीन दशकांपासून व्यवसाय करत आहे. यादरम्यान आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपयांची मदत केली. किंगफिशर एअरलाईन्सने सरकारलाही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून दिले. परंतु, दुर्देवाने किंगफिशर एअरलाईन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांचे कर्ज फेडू इच्छितो. माझ्यामुळे त्यांना तोटा होऊ नये असे मला वाटते. त्यामुळे बँकांनी हे स्वीकार करावे, असे मल्याने म्हंटले आहे.बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. मी बँकांना मुद्दलीतील १०० टक्के रक्कम भरायला तयार आहे. परंतु, व्याज देऊ शकणार नाही. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, अशी विनंतीही त्याने केली आहे.

मद्यसम्राट विजय मल्याने पूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दाखवली पण ?
Share on Social Media