Rajya-rani-express

राज्यराणी एक्स्प्रेसवर दगड फेक

महाराष्ट्र मुंबई

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगडफेक केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मंगळवारी (४ डिसेंबर) रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसवर मध्य रेल्वेच्या वासिंद आणि आटगाव स्थानकादरम्यान दगड फिरकावण्यात आला. त्यामुळे इंजिनची काच फुटली आणि ती काच केबिनमधल्या मोटरमनच्या डोळ्यात गेली. जखमी झालेल्या मोटरमनने कसारा स्थानकावर एक्सप्रेस थांबवली, येथे मोटरमनवर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर एक्सप्रेस नाशिककडे रवाना झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *