A_sample_of_Permanent_Account_Number_(PAN)_Card

फक्त चार तासांमध्ये तुम्हाला मिळू शकेल पॅनकार्ड

देश

आता पॅनकार्ड हे बहुतांश सर्व आर्थिक व्यवहारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. पण अनेकांना पॅनकार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया किचकट वाटत होती. पण पॅन कार्डसाठी आता फार दिवस वाट पाहावी लागणार नाही. अर्ज केल्यानंतर फक्त चार तासांमध्ये आता तुम्हाला पॅनकार्ड मिळू शकेल.
दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिली आहे. प्राप्तिकर विभागाकडे पॅनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष पॅनकार्ड मिळण्यासाठी किमान १० ते १५ दिवसांचा अवधी लागतो. पण या नव्या प्रणालीमुळे पॅनकार्ड केवळ चार तासांमध्ये मिळणे शक्य होईल. प्राप्तिकर विभाग पॅन कार्ड काढणे सुलभ व्हावे यासाठी एक प्रणाली घेऊन येत आहे. या प्रणालीमुळे वर्षभरानंतर आम्ही केवळ चार तासात पॅन कार्ड देण्यास सक्षम होऊ, असे सुशील चंद्रा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *