bbe31f44495fb20c9bcad3a336186d35

पाणी तापविण्याच्या हिटरने चार वर्षीय मुलीचा मृत्यू

महाराष्ट्र

घरातील पाणी तापविण्याच्या हिटरला हात लावताच विजेच्या धक्‍क्‍याने चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे मंगळवारी घडली.दिव्या कैलास गराड (वय 4, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गराड कुटुंबीय हे शिंदेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होते. मंगळवारी ते राहते घर बदलत होते. त्यामुळे घरात सर्वत्र सामान पसरलेले होते. सामान हलवण्याच्या घाईत घरातील पाणी तापवायचे हिटर चालूच राहीले होते.
यावेळी दिव्या तेथे खेळत-खेळत आली व तीने हिटरला हात लावला. त्यामुळे तिला जोराचा झटका बसला व ती जागीच बेशुद्ध झाली. पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *